काय सांगता? फक्त एकदाच गुंतवणूक करा, मिळेल 58 हजार रुपये पेन्शन; पहा LIC ची भन्नाट योजना !

Spread the love

marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [LIC Pension Yojana ] ; सर्वसाधारणपणे असे मानले जात आहे की, एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या संपत्तीवर वृद्धपकाळात सर्वाधिक प्रभाव होत असतो. म्हणून नोकरी करत असतानाच नोकरीच्या संयोगाने सेवानिवृत्तीची तयारी आधीपासूनच करणे तितकेच गरजेचे आहे. कारण जीवनाच्या युवा कालावधीमध्ये शरीर अगदी कठोरपणे काम करण्यास अगदी सक्षम असते. अशावेळी तुम्ही नक्कीच ही तयारी बिनधास्तपणे सुरू करू शकता. आज काल असंख्य अशा योजना आहेत ज्या अगदी वृद्ध अवस्थेत सातत्यपूर्ण उत्पन्न प्रदान करतात आणि याच कालावधीमध्ये एखाद्याच्या दैनंदिन गरजा सुद्धा अगदी सोयीस्करपणे पूर्ण करता येतात..

जर तुम्ही तुलनात्मक पेन्शन योजनेच्या शोधामध्ये असाल तर एलआयसी ची विशेष अशी सरल पेन्शन योजना तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे (LIC yojana in marathi). ही योजना मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर संपूर्ण आयुष्यासाठी पॉलिसीधारक नागरिकांना पेन्शन मिळवून देते. याचा विशेष भाग म्हणजे पेन्शन मिळवण्यास सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आता साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट बघायची गरज नाही. तुम्ही वयाच्या चाळीसव्या वर्षापासून अगदी बिनधास्तपणे पेन्शन घेण्याची सुरुवात करू शकता. चला तर या योजनेविषयी तपशील जाणून घेऊया.

एलआयसी ची पेन्शन योजना ही योजना अगदी तात्काळ पणे वार्षिकी प्रदान करते. तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर कधीही पेन्शन मिळवू शकता. ही पॉलिसी खरेदी करत असताना फक्त एका वेळेसाठी प्रीमियम भरणे तितकेच गरजेचे आहे. प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी धारक व्यक्ती असेल तर त्यास आयुष्यभर पेन्शन मिळत राहते (LIC scheme details). जर पॉलिसी खरेदीदाराचे इतर कोणत्याही कारणास्तव निधन झाले असेल तर जमा केलेली जी काही रक्कम असेल ती त्यांनी लावलेल्या नॉमिनीला मिळते.

हे पण वाचा : या आठवड्यातील 15000+ जागेसाठी महाभरती जाहिराती ; पाहा सविस्तर .

सिंगल लाईफ प्लॅन तसेच जॉईंट लाइफ प्लॅन : सरल पेन्शन योजनेच्या माध्यमातून तुम्ही अगदी दोन प्रकारे फायदे मिळवू शकता. सर्वसाधारणपणे एकल जीवण तसेच संयुक्त जीवन असे दोन प्रकार यामध्ये येतात. सिंगल लाईफ एप्लीकेशन अंतर्गत जोपर्यंत पॉलिसीधारक व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळतच राहते आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर गुंतवणुकीची काही रक्कम असेल ती त्याच्या नॉमिनीला पूर्णपणे एकाच वेळी परत केली जाते. दुसरीकडे बघितले तर संयुक्त जीवन पर्याय अंतर्गत पती-पत्नी दोघांना याचा लाभ मिळतो. ज्या ठिकाणी प्राथमिक पॉलिसीधारक व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत ही पेन्शन सातत्याने दिले जाते आणि ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे निधन होईल त्यावेळी पासून दोन्ही व्यक्तीचे रक्कम एकाच व्यक्तीच्या खात्यावर जमा केली जाते.

किमान पेन्शन 1000 रुपये तर जास्तीत जास्त ची मर्यादा नाही : सर्व पेन्शन योजनेच्या माध्यमातून पॉलिसीधारक व्यक्तींना कमीत कमी एक हजार रुपयांचे प्रति महिना रक्कम मिळवायचे संधी आहे. पॉलिसीधारक व्यक्तीला जी काही रक्कम मिळते ती त्या व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीवर ठरवली जाते. यामध्ये नागरिक वार्षिक रकमेचा लाभ घेऊ शकतात. तसेच त्रैमासिक, मासिक, अर्धवार्षिक अशा प्रकारे सुद्धा पेन्शनचा लाभ मिळू शकतात. निवडलेला जो काही पर्याय असेल त्यामध्ये पेन्शन रक्कम निश्चित केली जाते. एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीने तिच्या वयाच्या साठावे वर्षी या प्लॅनमध्ये तब्बल दहा लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर तिथून पुढे त्याच व्यक्तीस प्रति महिना 58 हजार रुपये प्रति वार्षिक पेन्शन मिळेल. ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही पद्धतीने तुम्ही ही पेन्शन खरेदी करू शकता.

Leave a Comment