Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Resolution issued on 15.04.2026 regarding the strict implementation of instructions concerning promotions. ] : पदोन्नती संदर्भात सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.15.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेला आहे कि , यंत्रणेच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाचे दि.12.09.2016 व दि.01.08.2019 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद सुचनांचे अवलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी पदोन्नती नाकारल्यास , अवलंबवावयाची कार्यपद्धतीमध्ये पदोन्नतीचा पदाचा कार्यभार स्विकारण्यापुर्वी पदोन्नती नाकारल्यास दि.12.09.2016 च्या शासन निर्णयांमध्ये नमुद कार्यपद्धतीनुसार नियमित निवडसुची / तदर्थ निवडसुचीमधून नाव वगळण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच कार्यभार स्विकारल्याच्या नंतर पदोन्नती नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत . त्या अनुषंगाने सर्व अधिकारी / कर्मचारी यांना निर्देश देण्यात येत आहे कि , पदोन्नतीसाठी विचार क्षेत्रात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पदोन्नती होण्यापुर्वी पदोन्नती निवडसुचीतुन नाव वगळणेबाबत अथवा पदोन्नतीचा कार्यभार स्विकारण्यापुर्वी ..
पदोन्नती नाकारण्याबाबत , शासनांस / संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यास अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच पदोन्नतीचा कार्यभार स्विकारल्यानंतर पदोन्नती नाकारण्याबाबत , कोणत्याही अर्ज / विनंतीचा विचार केला जाणार नसल्याची बाब नमुद करण्यात आली आहे .
तसेच सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी सर्व सुचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरुपात वाढविणेबाबत GR निर्गमित दि.05.08.2026
- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत GR निर्गमित दि.07.08.2026
- वर्ग 3 (गट क) व वर्ग 4 (गट ड) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणामध्ये सुधारणा ; GR दि.04.08.2026
- मंत्रीमंडळ निर्णय : दि.04.08.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 07 मोठे मंत्रीमंडळ निर्णय !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR