राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीनुसार सलग 03 महिने ते 05 वर्षे पर्यंत घेता येते असाधारण रजा ; जाणून घ्या रजा नियमावली !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government employees can take extraordinary leave for a period of 03 months to 05 years, depending on their service period. ] : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना म.रा.नागरी सेवा नियम ( रजा नियमावली ) नुसार , असाधारण रजा नियम 63 नुसार 03 महीने ते 5 वर्षे पर्यंत रजा घेता येते .

असाधारण रजा म्हणजे काय ? : कर्मचाऱ्याची खाती इतर कोणत्याही प्रकारची रजा शिल्लक नसेल , अशा प्रसंगी कर्मचाऱ्यांस रजा आवश्यक असेल , तर त्यास असाधारण रजा दिली जाईल , तसेच थेट असाधारण रजेची मागणी केली तरी या प्रकारची रजा दिली जाते .

कायम ( स्थायी ) कर्मचारी : राज्य शासन सेवेत स्थायी / कायम झालेल्यांना रजा नियमावली नुसार कोणतीही रजा ही सलग 05 वर्षे पेक्षा अधिक काळाकरीता मंजूर करता येत नाही .

अस्थायी कर्मचारी : साधारणपणे राज्य शासने सेवेत कर्मचाऱ्यांने सलग 03 वर्षे समाधानकारक सेवा पुर्ण केल्यास , अशा कर्मचाऱ्यांस स्थायीत्व प्रमाणपत्र दिले जाते , सदर स्थायीत्व प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्यांना अस्थायी कर्मचारी म्हणून ग्राह्य धरण्यात येते . सदर अस्थायी कर्मचाऱ्यांना रजा नियम 63 नुसार  असाधारण रजा किती दिवस व कोणत्या प्रयोजन करीता मिळते ? ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सेवा कालावधीरजा कालावधीआधार , कारणे
कोणताही कर्मचारी03 महिना पर्यंतवैद्यकिय प्रमाणपत्राशिवाय ( खाजगी कारणे . )
01 वर्षे सेवा नंतर06 महिना पर्यंतवैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे
01 वर्षे सेवा नंतर12 महिना पर्यंतमानसिक रोग , कर्करोग करीता
01 वर्षे सेवा नंतर18 महिना पर्यंतकृष्ठरोग , क्षयरोग ग्रस्तांसाठी
03 वर्षे सेवा नंतर24 महिना पर्यंतउच्च अभ्यासक्रम करीता
05 वर्षे सेवा नंतर12 महिना पर्यंतवैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर .

असाधारण रजा काळात पगार / इतर देय भत्ते मिळते का ? : असाधारण रजा काळांमध्ये कर्मचाऱ्यांस कोणतेही वेतन मिळत नसले तरी , सदर कर्मचारी रजेवर जाण्यापुर्वी घेत असणारे घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता हा रजा काळात सदर प्रयोजनावरच खर्च करीत असल्याचे प्रमाणपत्र व संबंधित प्राधिकरणांस खात्री पटल्यानंतर सदर घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ताचा लाभ घेता येईल .

Leave a Comment