Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Four financial benefits for state employees and pensioners in August paid in September salary ] : राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन / पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत .
राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत . यांमध्ये पगार वाढ व डी.ए वाढीसह फरकाचा समावेश आहे .
महागाई भत्ता वाढ : राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार , राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर 53 टक्के वरुन 55 टक्के अशी वाढ लागु करण्यात आलेली आहे .
सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक 01.01.2025 पासुन डी.ए फरकासह लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यामुळे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना डी.ए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकुण 07 महिन्यांचा डी.ए फरक मिळणार आहे .
हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वेतनवाढ : दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागु केली जाते ,परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होई पर्यंत माहे ऑगस्ट महिना लागुन जातो . यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्यांचा वेतनवाढ फरक अदा केला जाईल .

अशा प्रकारे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वरी नमुद 04 आर्थिक लाभ मिळणार आहेत .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025