दि.08 व 09 जुलै रोजीची सुट्टी राज्यातील सर्वच शाळांना मिळणार का ? जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Clarification regarding holidays for schools in the state on July 8th and 9th ] : दिनांक 08 व 09 जुलै रोजी राज्यातील शाळांना सुट्टी असणार असल्याची बातमी प्रसारित होत आहे , ही सुट्टी नियोजित सुट्टी नसुन , यामागचे शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन आयोजित आहे .

आंदोलनांमध्ये सहभाग : दिनांक 08 व 09 जुलै रोजी राज्यातील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संप आयोजित करण्यात आलेला असून , या संपाला संयुक्त मुख्याध्यापक , महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ , तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांकउून बिनशर्त पणे पाठिंबा देण्यात आलेला आहे .

शिक्षकांची प्रमुख मागणी : दि.08 व 09 जुलै 2025 रोजी शिक्षकांकडून आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाचे मुख्य मागणी म्हणजे अनुदानित / अंशत : अनुदानित शाळांच्या टप्पा मध्ये वाढ करणे , अनुदानांमध्ये वाढ करणे अशा प्रमुख मागण्या आहेत .

अनुदान टप्पा वाढीचा GR निर्गमित होवून देखिल सरकारकडून निर्णय घेतला जात नसल्याने , सदर आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहेत .

सर्वच शाळांना सुट्टी असणार का ? : सदर आंदोलन हे अनुदानित शाळांमधील शिक्षक / कर्मचाऱ्यांचे असल्याने , राज्यातील सर्वच अनुदानित / अंशत : अनुदानित शाळांना सुट्टी असेल , याशिवाय सदर आंदोलनांसाठी पाठिंबा देण्यात आलेल्या संघटनांच्या संलग्न असणाऱ्या शाळांना देखिल सुट्टी असेल .

Leave a Comment