marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra OBC cast list shasan nirnay ] : राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागस प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून , याबाबत सुधारित इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील अनुसुचित जाती , विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची अद्ययावत यादी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 26 सप्टेंबर 2008 च्या पत्रानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे .
यांमध्ये विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जाती , जमाती संदर्भातील नियमन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत करण्यात येते . तसेच विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे जाती प्रमाणपत्र देणाऱ्या व त्यांची पडताळणी करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांना तसेच …
मागास वर्गीयांचे लाभ लागु करताना सदरहु यादीचा उपयोग व्हावा याकरीता सुलभ संदर्भाकरीता एकत्रित संकलन स्वरुपाची यादी सदर शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे .सदरची यादी ही संकलन स्वरुपाची असून , मागास वर्गीय जाती , जमातीच्या निश्चितीकरीता तसेच त्या-त्या मागास प्रवर्गाचे लाभ लागु करताना , सदर जाती / जमातींचा ज्या शासन निर्णय व आदेशानुसार समावेश करण्यात आला आहे तो शासन निर्णय व आदेश ग्राह्य धरण्यात यावा असे नमुद करण्यात आला आहे .
हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये 1266 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
प्रवर्गनिहाय विमुक्त जाती – अ ( आरक्षण 3 टक्के ) , भटक्या जमाती – ब ( 2.5 टक्के आरक्षण ) , भटक्या जमाती – क ( 3.5 टक्के आरक्षण ) , भटक्या जमाती – ड ( 2 टक्के आरक्षण ) , इतर मागास वर्ग ( 19 टक्के आरक्षण ) सदर प्रवर्गनिहाय सुधारित जातींची यादी सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
या बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय (PDF)
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025