यंदाच्या वर्षी शाळांना 128 दिवस सुट्टी तर शालेय कामकाज 237 दिवस असणार ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

@marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ This year, there will be 128 days of school holidays and 237 days of school work. ] : यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुट्टीचे दिवस हे 128 असणार आहेत , तर शालेय कामकाजाचे दिवस हे 237 असणार आहेत .

शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.18 जुन रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला असून , सदर परिपत्रकानुसार राज्यातील शाळेतील तासिकांचे नियोजन तसेच सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत .

सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील शालेय कामकाजाचे दिवस 237 इतके असणार आहेत . यांमध्ये शाळेतील अध्ययन – अध्यापन कृती ( वर्गकार्य ) करीता 210 दिवस असणार आहेत .

तर परीक्षा , मुल्यांकन व त्या अनुषंगिक कृती करीता 14 दिवस असणार आहेत . तर सह – शालेय उपक्रम – यांमध्ये दत्परविना 10 दिवस , आनंदायी शनिवार , शैक्षणिक सहल , शिबीर , सण – उत्सव इ करीता 13 दिवस देण्यात आले आहेत .

यंदाच्या वर्षी रविवारच्या एकुण 52 सुट्टी आल्या आहेत , तर अन्य सार्वजनिक सुट्ट्या ह्या 76 दिवस असणार आहेत , असे एकुण यंदाच्या वर्षी 128 दिवस शाळेला सुट्टी असणार आहे .

यंदाच्या वर्षी पासुन राज्यातील सर्व शाळांसाठी सुधारित वेळापत्रक देखिल सुधारित करण्यात आलेले आहेत , त्यानुसार यंदाच्या वर्षीचे शाळा भरत आहेत .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *