उच्च शिक्षण धारकांना वर्ग 01 व वर्ग 02 पदांवर थेट पदोन्नती ; परिपत्रक दि.07.08.2025

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Direct promotion to Class 01 and Class 02 posts for higher education holders ] : उच्च शिक्षण धारक यांमध्ये पीएचडी धारण केलेल्या शिक्षकांची शिक्षण विभागामधील वर्ग 01 व वर्ग 02 या पदांवर थेट नेमणुक करणेबाबत , ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक करण्यात आला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे कि , शासनांच्या दिनांक 07.011.2023 रोजीच्या समक्रमांकाच्या पत्रानुसार , उपस्थित करण्यात आलेल्या सुचनेच्या अनुषंगाने टिप्पणी व संबंधित कागदपत्रांच्या प्रतिसह सादर करणेबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय सर्व यांना कळविण्यात आले होते .

तथापि याबाबतचा अहवाल अद्यापही सरकारला प्राप्त झालेला नाही , याकरीता सदरची बाब ही अतिशय गंभीर असून , विधानमंडळ प्राथम्य विचारात घेता , याबाबतचा अहवाल हा शासनांस तात्काळ उलट टपाली सादर करण्याची विनंती करण्यात आलेली आहे . सदरचा अहवाल विहीत कालमर्यादेत प्राप्त न झाल्यास , याबाबतचा संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे .

हे पण वाचा : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

यामुळे पीएचडी धारक शिक्षकांना आता थेट वर्ग 01 व वर्ग 02 पदांवर थेट पदभरती मिळणार आहे . याकरीता ग्रामविकास विभाग मार्फत प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे .

Leave a Comment