सात महिने ते 06 वर्षे पर्यंत बालकांना आहारखर्च प्रतिदिन 08 रुपये करण्यास शासन मान्यता .. GR निर्गमित दि.04.08.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government approves Rs 8 per day for food expenses for children aged seven months to 6 years ] : सात महिने ते 06 वर्षे वयोगटातील बालकांना प्रति दिन देण्यात येणाऱ्या आहार खर्चात 02 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देणेबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दि.04.08.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

अनुसुचित क्षेत्रातील कुपोषण , मातामृत्यु बालमृत्यु व कमी वजनाची बालके जन्माला येणे या सारख्या गंभीर समस्यांचे निर्मुलन करण्यासाठी राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या अंगणवाड्या मार्फत अनुसुचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना दिनांक 01.12.2015 पासुन सुरु करण्यात आलेली आहे .

या योजना नुसार अनुसुचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतर्गत 07 महिने ते 06 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना प्रति दिन मुलांना 02 केळी / 01 उकडलेले अंडे आठवड्यातुन 04 वेळा म्हणजेच महिन्यातुन 16 दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार म्हणून देण्यात येत आहे .

भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या दिनांक 18 नोव्हेंबर 2015 व दिनांक 05.08.2016 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार तसेच सदर योजनेच्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या दिनांक 23.04.2025 रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयास…

हे पण वाचा : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 394 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

 अनुसरुन 07 महिने ते 06 वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात येणाऱ्या 02 केळी / 01 अंडे याकरीता देण्यात येणारा आहारखर्च रुपये 06 रुपये वरुन 08/- रुपये करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .

Leave a Comment