Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Salary hike for teachers/non-teaching staff in the state in August; Know the decision of the Education Minister ] : यंदा राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदान येथे अनुदान टप्पा वाढीसाठी आंदोलन सुरु होते , सदर आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारकडून माहे ऑगस्ट महिन्यांच्या पगारात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे .
सध्या राज्यात 49,562 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदानावर कार्यरत आहेत . सदर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट महिन्यांपासुन 20 टक्के टप्पा वाढ करण्याची ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे .
याकरीता शिक्षण विभागाने वित्त विभागांकडून 1400 कोटी रुपये इतक्या रक्कमेची मागणी करण्यात आलेली आहे . सदर निधी प्राप्ती नंतर राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढीचा लाभ दिला जाणार आहे .
ज्या शाळा 1999 सालापासुन 60 ते 80 टक्के अनुदानावरच कार्यरत आहेत , अशा शाळांना आता पुर्ण अनुदानावर करण्यात येणार आहेत . सदर अनुदान वाढ ही माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत मिळणार आहे .
ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनासोबत 20 टक्के टप्पा वाढ : माहे ऑगस्ट महिन्यांच्या वेतनासोबत टप्पा अनुदानावरील शाळांना 20 टकके वाढीव अनुदान देण्यात येणार आहे . शासन निर्णयानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026