Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Free travel gift for government employees ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नविन वर्षापासुन रजा प्रवास सवलत अंतर्गत , वंदे भारत , हमसफर , तेजस या गाड्यांमधून मोफत प्रवास करु शकणार आहेत . याबाबत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या रजा प्रवास सवलत ( LTC ) धोरण तयार करण्यात आलेले आहेत .
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अंतर्गत 385 गाड्यांमधून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, आता 136 वंदे भारत एक्सप्रेस , 08 तेजस एक्सप्रेस व 97 हमसफर गाड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे .
तेजस , वंदे भारत व हमसफर पुर्वी कर्मचाचारी शताब्दी , राजधानी , दुरांतो या सारख्या 144 हाय स्पीड ट्रेनमधून कर्मचारी प्रवास करु शकत होते . सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आता रजा प्रवास सवलत अंतर्गत तेजस , वंदे भारत व हमसफर या हायस्पीड ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेता येणार आहेत .
हे पण वाचा : सातवा वेतन आयोग वेतनश्रेणी तक्ता ..
रजा प्रवास सवलत : कर्मचाऱ्यांना सेवेच्या काळात पर्यटन करण्यासाठी रजा प्रवास सवलत दिली जाते . यांमध्ये प्रवासाला येणारा खर्च वेतनाच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना दिला जात असतो . यांमध्ये आपल्या स्वग्राम , तसेच पर्यटन करीता भारतात कोणत्याही ठिकाणी 02 वर्षातुन एकदा प्रवास करण्याची सुविधा देयात येते .
या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना हायस्पीड व अत्याधुनिक प्रवास सुविधाचा लाभ मिळणार आहे .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026