शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026

Spread the love

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Circular dated 18.08.2026 regarding the extension of the deadline for completing e-KYC for employees under the Shalarth system. ] : शालार्थ प्रणालीतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत मुदतवाढ देणेबाबत दि.18.08.2026 रोजी शिक्षण संचालनालय मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सेवार्थ प्रणालीतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पुर्ण करणेबाबत , सविस्तर निर्देश देण्यात आले आहेत , यानुसार माहे ऑगस्ट 2026 पर्यंत ई-केवायसी पुर्ण करणेबाबत , मुदतवाढ देण्यात आलेली होती .

तथापि क्षेत्रिय स्तरावर शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी कामाचा आढावा घेण्यात आला असता , सदर कामाकरीता काहीसा कालावधी लागण्याची शक्यता असून त्यामुळे खाजगी व्यवस्थापनाच्या अशंत : अनुदानित व जिल्हा परिषद प्राथमिक / माध्यमिक शाळेतील शालार्थ प्रणालीमधून वेतन ..

घेणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी दि.20.09.2026 पर्यंत पुर्ण करण्याकरीता मुदतवाढ देण्यात येत आहे . तसेच दि.20.09.2026 पर्यंत E-KYC पुर्ण न केल्यास , संबंधित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर 2026 चे वेतन पुर्ण करण्याकरीता यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

Leave a Comment