Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding intra-district transfer requests of teachers… (Satyajit Tambe) ] : शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या बाबत सत्यजित तांबे यांनी मा.ना.जयकुमार गोरे साहेब मंत्री ग्रामविकास विभाग यांच्या प्रति पत्र सादर करण्यात आले आहे .
सदर पत्रानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील प्राथमिक शिक्षकांची निवेदनानुसार जनगणनेच्या राष्ट्रीय कामकाजामुळे मे 2026 मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होवू शकल्या नाहीत . तसेच दिनांक 16.06.2026 रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्पा पुर्ण झालेला आहे .
पुढील टप्पा फेब्रुवारी 2027 पासुन सुरु होणार आहे . त्यामुळे नविन शिक्षक भरतीपुर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया तातडीने राबविणे आवश्यक आहे अशी बाब नमुद करण्यात आली आहे .
तसेच राज्यातील अपंग , महिला शिक्षिका , आजारी शिक्षक तसेच पती – पत्नी एकत्रीकरण प्रकरणे , दुर्गम भागातील शिक्षक , तसेच मागील ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे गैरसोय झालेल्या एकल शिक्षक इच्छुक शिक्षकांच्या बदल्या जिल्हा सेवाज्येष्ठता नुसार निव्वळ रिक्त जागांवर विनाअट करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर राज्यातील अनेक शिक्षक तसेच पती – पत्नी 18-20 वर्षांपासुन वेगवेगळ्या जिल्ह्यांत कार्यरत असून विशेषत : महिला शिक्षकांना कौटुंबिक , मानसिक तसेच शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत .
यामुळे राज्यातील हजारो शिक्षक व त्यांच्या कुटुंबाच्या हिताचा विचार करुन शिक्षक भरतीपुर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या तसेच पती – पत्नी एकत्रीकरणासाठी आंतरजिल्हा बदल्या विनाअट राबविण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे .

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश