Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding earned leave (compensatory leave) for employees participating in census work and national duty campaigns… ] : जनगणना कार्य व राष्ट्रीय कर्तव्ये मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना अर्जित रजा ( बदली रजा ) बाबत सहसंचालक जनगणना कार्य निदेशालय , महाराष्ट्र जनगणना कार्यालय मुंबई यांच्याप्रति जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मार्फत पत्र सादर करण्यात आले आहेत .
सदर पत्रानुसार श्री.शेख अब्दुल रहिम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशन रा.विनस फुटवेअर , शहीद भगतसिंग चौक , मेन रोड सिल्लोड छ.संभाजीनगर यांना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे जनगणना कार्याबद्दल अर्जित रजा कर्मचाऱ्यांच्या खाती जमा करण्याचे निवेदन अर्ज सादर करण्यात आले होते .
याअनुषंगाने श्री.शेख अब्दुल रहीम यांचा अर्ज दि.01.06.2026 रोजीच्या अर्जानुसार नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे व केलेल्या कार्यवाही बाबत संबंधितास कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर कार्यवाही करण्याचे निर्देश हे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी नांदेड यांच्या मार्फत देण्यात आले आहेत .

- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणबाबत…
- जनगणना कार्य व राष्ट्रीय कर्तव्ये मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना अर्जित रजा ( बदली रजा ) बाबत …
- राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा ! जाणून घ्या सुधारित सेवाप्रवेश ..
- SIR ( मतदान केंद्रस्तरती अधिकारी ) चे कामकाज दिलेल्या शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी ( शालेय वेळेव्यतिरिक्त ) काम देणेबाबत आदेश .दि.27.06.2026
- जनगणना कामकाज केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना मानधन व प्रशिक्षण भत्ता किती व कधी मिळणार ?