राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित माणगी संदर्भात पुकारण्यात आलेल्या संपाबाबत ; महत्वपुर्ण GR निर्गमित दि.20.04.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding the strike called by State Government employees concerning various pending demands: Important Government Resolution (GR) issued on April 20, 2026. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणी संदर्भात सामान्य प्रशासन मार्फत दि.20.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलाआहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे कि , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघट महाराष्ट्र यांनी दि.21.04.2026 पासुन बेमुदत संप करण्याची नोटीस सरकारला दिली आहे .

सदर संपाच नागरी सेवा नियम 1979 नुसार प्रतिबंध करण्याल आहेत आहे , दि.21.04.2026 पासुन बेमुदत संप कालावधीत सरकारचे कामकाज सुरळीतरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना खालील उपाय योजना करण्याच्या सुचना देण्यात आले आहेत .

यामध्ये कर्मचारी संपात सहभागी होणे ही बाब गैरवर्तवणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल , व अशा प्रकारचे आदेश विना विलंब निर्गमित करण्यात यावेत व ते सर्व कर्मचारी यांच्या व्यक्तीश : निदर्शनास आणावेतन तसेच आदेशाची प्रत शासनांच्या प्रत्येक विभाग / कार्यालय यांच्या सुचना फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता , नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच संप काळांमध्ये कार्यालयात नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करण्याचे व ती व्यवस्था जबाबदार अधिकारी यांच्याकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच आवश्यकता भासल्यास पोलिस / गृहरक्षक दलाची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर आदेशाच्या दिनांकापासुन संप संपपर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करुन नये व जे कर्मचारी रजेवर असतील अशा प्रत्येक प्रकारणी विचार करुन त्यांची रजा रद्द करुन त्यांना कामावर तात्काळ बोलवावे व कसे ते ठरवावे असे निर्देश देण्यात आले आहेत .

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाने काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याचे कर्मचाऱ्यांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment