Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ State officials and employees will not receive their salaries for the month of April until this task is completed. ] : माहे एप्रिल महिन्याचे वेतन अदा करणे संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.27.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांनी माहे एप्रिल पेड इन मे 2026 वेतन अदा होण्याच्या अगोदर ई- केवायसी पुर्ण करणे आवश्यक असणार आहे .
कर्मचाऱ्यांने सदर ई-केवायसी पुर्ण न केल्यास , माहे एप्रिल पेड इन मे 2026 चे वेतन आहारित केले जाणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे . यामुळे सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असणाऱ्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करुन बँक खाते अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे .
याशिवाय सेवार्थ मध्ये पॅन क्रमांक चुकीचा असल्यास, सदर पॅन क्रमांक दुरुस्ती करुन अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे .अशा प्रकारची ई – केवायसी पुर्ण करुन संबधित अधिकारी / कर्मचाऱ्यांनी व्यक्तीश : त्यांचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर कामकाज पुर्ण न केल्यास यापुढे वेतन आहरित केले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहेत .

- 📰 महाराष्ट्रातील आजच्या काही प्रमुख बातम्या … दि.01.09.2026
- भाषा सुट संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.31.08.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.31.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 02 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र नमुन्यात सुधारणा करणेबाबतचा GR ( वित्त विभाग )
- पेन्शन संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्वाळा ; पेन्शन पुनर्रचनाचे आदेश ..