Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Amendment in Character and Background Verification Process GR issued on 27.03.2026 ] : चारित्र्य पडताळणी व पुर्वइतिहास पडताळणी प्रक्रिया मध्ये सुधारणा करणेबाबत गृह विभाग मार्फत दिनांक 27.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार चारित्र्य पडताळणी व पुर्वइतिहास प्रमाणपत्र करीता निश्चित करण्यात आलेले शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . यांमध्ये सामान्य PCC करीता 159/- , सुरक्षा रक्षक PCC करीता 159/- रुपये तर परदेशी जाण्याकरीता PCC साठी 159/- रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे .
तर केंद्र / राज्य शासनांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नि-शासकीय संस्था तसेच स्थायत्त संस्था , सार्वजनिक उपक्र इ. मध्ये कार्यरत अथवा नियुक्त होवू घातलेल्या कर्मचाऱ्यांकरीता चारित्र्य व पुर्वइतिहास पडताळणी करीता देखिल वरी नमुद केल्याप्रमाणेच शुल्क आकरण्यात येईल .
तर केंद्र / राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अथवा नियुक्तीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य व पुर्वइतिहास पडताळणी प्रक्रिया बाबत स्वतंत्रपणे प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित केला जाईल असे नमुद करण्यात आले आहेत .
सदरची सुविधा ही आपले सरकार या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी Click here
- पटसंख्या व कार्यरत शिक्षक यानुसार तात्पुरती व्यवस्था करणेबाबत परिपत्रक ..दि.06.07.2026
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.16.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्वपुर्ण : SBI मधुन पेन्शन घेत असाल तर CPP पेन्शन पॅकेजचे फायदे जाणून घ्या व लाभ घ्या !
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026