Marathisahita खुशी पवार प्रतिनिधी [02 consecutive days of holiday in the state on 07th and 08th February ] : राज्यांमध्ये दिनांक 07 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी सलग 02 दिवस सुट्टी मिळणार आहे . या संदर्भात उद्योग ,उर्जा व कामगार विभाग मार्फत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.30.01.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यात दिनांक 07 फेब्रुवारी रोजी निवडणुक होणाऱ्या 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत ससिमतीच्या क्षेत्रातील शाळा , महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे .
त्याचबरोबर सदर जिल्हा परिषदा व पंचायत समिती क्षेत्रातील मतदार असणाऱ्या राज्यातील इतर ठिकाणी कामानिमित्त ( यांमध्ये सरकारी / खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सर्वांना) असणाऱ्या सर्वांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी दि.07 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
अशा प्रकारची सुट्टी पासुन मतदारांना वंचित ठेवण्यात आल्यास , मतदारांच्या तक्रारीनुसार सदर आस्थापना प्रमुखांवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे .
सलग 02 दिवस सुट्टी : दि.07 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे तर दिनांक 08 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग 02 दिवस सुट्टी मिळणार आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click Here
- 5 राज्याचा अंतिम विधानसभा निकाल ; सविस्तर निकाल .
- माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR ; दि.30.04.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.30.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 07 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात सुधारित परिपत्रक निर्गिमित दि.27.04.2026
- जनगणना 2027 करीता घरयादी व घरगणना सुचना माहिती पुस्तिका मराठी माध्यम PDF !