राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 2% डी.ए ( एकुण 55% दराने )  कधी मिळणार ? काय आहेत मंत्रालयीन हालचाली !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ When will state employees get an additional 2% DA (total 55%); What are the ministerial moves ? ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 2 टक्के डी.ए वाढ कधी याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत .

वाढीव महागाई भत्ता : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेला वाढीव 02 टक्के राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा देखिल डी.ए केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक 01.01.2025 पासुन 55% इतका होणार आहे .

अधिकृत्त शासन निर्णय कधी ? : राज्य सरकारकडून दिनांक 01.01.2025 पासुनच राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ लागु करण्यात येणार आहे . परंतु अधिकृत्त शासन निर्णयास मुहुर्त लागत नसल्याने सदर निर्णय लांबणीवर जात आहे .

हे पण वाचा : नविन वेतन आयोगा कामाच्या आधारावर मिळणार वेतनवाढ ; इतर वेतन आयोगापेक्षा आठवा वेतन आयोगात असतील अमुलाग्र बदल !

मंत्रालयीन हालचाली : सुत्रानुसार प्राप्त माहितीप्रमाणे या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत महागाई भत्ता वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित केला होईल . ज्यामुळे माहे जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयक सोबत वाढीव 02 डी.ए वाढ दिनांक 01.01.2025 पासुन डी.ए थकबाकीस रक्कम अदा केली जाईल .

वित्त विभाग मार्फत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आले असल्याची वृत्त समोर येत आहेत . मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) निर्गमित केला जाईल .

Leave a Comment