राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 55% डी.ए वाढीचा लाभ कधी ? अधिवेशन निर्णयानंतर जुलै वेतन / पेन्शन सोबत दिला जाईल वाढीव महागाई भत्ता !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ state employee da nirnay update ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार , या संदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल . याकडे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांचे लक्ष लागले आहेत .

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे , या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा महागाई भत्ता बाबत निर्णयाची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे .

वित्त विभाग मार्फत प्रस्ताव : प्राप्त माहितीनुसार राज्याच्या वित्त विभाग मार्फत राज्यातील सरकारी / निमसरकारी ( जिल्हा परिषद ) कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 02 टक्के वाढीव डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे .

सदर डी.ए वाढ ही दिनांक 01.01.2025 पासुन लागु केली जाणार आहे , यामुळे राज्यातील कर्मचारी / पेन्शन धारकांना दिनांक 01.01.2025 पासुन डी.ए थकबाकीसह वाढीव 02 टक्के महागाई भत्ता दिला जाईल , यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए देखिल केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होईल .

जुलै वेतनासोबत वाढीव डी.ए : अधिवेशनात डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेतला गेल्यास , राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै पेड इन ऑगस्ट वेतन / पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष डी.ए वाढीचा लाभ अनुज्ञेय केला जाईल .

Leave a Comment