Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Revised Government Decision issued for Group C and D cadre employees on 31.07.2025 ] : राज्यातील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय लागु करणेबाबत , ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 31 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 17.07.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना लागु करण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या सर्व तरतुदी ह्या जशाच्या तसे सर्व जिल्हा परिषद गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येत आहेत . यांमध्ये ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधाची कार्यवाही सुरु असल्याने ,
सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासुन प्रथमत : 02 वर्षांसाठी गट ड च्या सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या 20 टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करुन गट ड असणाऱ्या पदांच्या मंजूर मर्यादेत अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच शासन निर्णयाच्या दिनांकापासुन 02 वर्षानंतर गट ड च्या प्रतिक्षासुचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेवून मर्यादा शिथिल करण्याबाबत , पुनर्विचार करण्यात येईल , अशी बाब नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : LPC प्रणापत्राच्या नमुन्यात सुधारणा ; GR निर्गमित दि.25.07.2025
जिल्हा परिषदांच्या बाबतीत विहीत मुदतीनंतर कमाल दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास , विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना राहतील अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .
तसेच जिल्हा परिषदांच्या बाबतीत गट क व गट ड ची प्रतिक्षासुची त्या त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकरी यांच्या स्तरावर ठेवण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
- नविन वेतन आयोग : पदोन्नती / वेतनवाढ करिता परिक्षा / अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक ; जाणून घ्या अपडेट !
- वेतनत्रुटी निवारण समिती अहवालातील सुधारित वेतनश्रेणी अमान्य करण्यात आलेल्या पदांना पुनश्च संधी ; जाणून घ्या सविस्तर .
- सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58% महागाई भत्ता वाढीचा लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभ वेळेवर अदा करणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.01.08.2025
- LIC Policy Scheme : एलआयसीच्या या भन्नाट योजनेमध्ये दररोज 166 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर मिळवा 50 लाख रुपये !