राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय … ( Retirement Age ) ; संक्षिप्त आढावा !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Retirement age , sate employee info ] : राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्तीचे वय वाढ संदर्भात काही संक्षिप्त माहिती या लेखाच्या माध्यमातुन पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

निवृत्तीचे वय : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गट ड संवर्ग व्यतिरिक्त इतर सर्व संवर्गातील पदांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे , तर गट ड संवर्गातील पदांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहेत .

नुकतेच राज्यातील उच्च तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक पदांच्या निवृत्तीचे वय हे 65 वर्षे पर्यंत वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . तसेच याशिवाय राज्यातील न्यायाधिशांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे आहे .

त्याचबरोबर राज्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षांपर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . यापुर्वी 58 वर्षे वरुन 60 वर्षे निवृत्तीचे वय करण्यास मंजुरी देण्यात आली होती . सन 2023 पासुन सदर अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 62 वर्षे इतके करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना “नियुक्ती ते सेवानिवृत्ती” पर्यंत एकच प्रणाली संलग्न करणेबाबत निर्गमित दि.20.06.2025

निवृत्ती वय वाढीची आवश्यकता : विशेष कौशल्य , विशेष ज्ञान आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ लागतो . सदर ज्ञानाचा व कौशल्याचा वापर हा जनतेच्या सेवेसाठी / प्रशासन चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी सदर विशेष कौशल्यांमध्ये पारंगत कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक आहे .

Leave a Comment