Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the implementation of revised pay structure for these state employees, Government Decision issued on 16.02.2026 ] : राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.16.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 22.10.2019 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी ( यशदा ) पुणे या प्रशिक्षण संस्थेतील एकुण 54 संवर्गातील 148 पदांना सुधारित वेतन संरचना मंजूर केली आहे .
यानुसार सदर संस्थामधील खाली नमुद केलेल्या संवर्गांना सुधारित वेतनसंरचना मंजूर करण्यात येत आहेत .
| संवर्गाचे नाव | सातवा वेतन आयोग नुसार मंजूर वेतनस्तर | सुधारित वेतनस्तर ( समितीच्या शिफारशीनुसार ) |
| लघुलेखक ( निवडश्रेणी ) | S-16 : 44900-142400 | S-17 : 44900-142400 |
| लघुलेखक ( उच्चश्रेणी ) | S-15 : 41800-132300 | S-16 : 44900-142400 |
| लघुलेखक ( निम्नश्रेणी ) | S-14 : 38600-122800 | S-15 : 41800-132300 |
सुधारित वेतन संरचनेतील वेतननिश्चिती व वेतनाच्या थकबाकीचे प्रदान हे वित्त विभागाच्या दिनांक 13.02.2023 व दि.02.06.2025 मधील तरतुदींनुसार करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

- राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डी.ए वाढ कधी ? आली मोठी आनंदाची अपडेट .
- महागाई भत्ता 50% झाल्यापासुनच निवृत्ती उपदानाचा कमाल मर्यादेत वाढ ; निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच .. परिपत्रक निर्गमित !
- या राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागु करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित दि.16.02.2026
- अधिकारी / कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविणेबाबत नविन ॲपचे अनावरण !
- पेन्शन संदर्भात न्यायालयाचा मोठा दिलासादायक निकाल ; पेन्शन बक्षीस नसुन संविधानिक अधिकार !