Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 3 Government Decisions GR issued through Finance Department regarding DA increase to pensioners in the state dated 26.02.2026 ] : राज्यातील पेन्शन धारकांना डी.ए वाढ बाबत वित्त विभाग मार्फत दि.26.02.2026 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.पाचवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डी.ए वाढ : असुधारित वेतनश्रेणीत ( पाचव्या वेतन आयोग प्रमाणे ) पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01.07.2025 पासुन 474 टक्के प्रमाणे म्हणजेच एकुण 8 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेला आहे .
02.सहावा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांसाठी डी.ए वाढ : असुधारित वेतनश्रेणीत ( सहाव्या वेतन आयोगप्रमाणे ) पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांना दि.01.07.2025 पासुन 252 टक्के वरुन 257 टक्के इतका डी.ए वाढ लागु लागु करण्यात येत आहे .
03.सातवा वेतन आयोग : सातवा वेतन आयोग प्रमाणे पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना दि.01.07.2025 पासुन 55 टक्के वरुन 58 टक्के इतका डी.ए वाढ लागु करण्यात आला आहे .
वरील तीन्ही प्रकरणी प्रत्यक्ष डी.ए वाढ ही माहे फेब्रुवारी महिन्यांच्या पेन्शन सोबत डी.ए वाढ लागु करण्याचे निर्देश देण्यात आले असून , माहे जुलै 2025 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीमधील डी.ए थकबाकी मार्च महिन्यांच्या पेन्शनसोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तर उर्वरित कालावधीमधील थकबकाकी अदा करणेबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत .
- राज्य कर्मचारी संदर्भात इतर 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.26.02.2026
- राज्यातील पेन्शन धारकांना डी.ए वाढ बाबत वित्त विभाग मार्फत 3 शासन निर्णय GR निर्गमित दि.26.02.2026
- फेब्रुवारी 2026 च्या वेतनासोबत वाढीव घरभाडे भत्ता / थकबाकी अदा करण्याचे निर्देश ; परिपत्रक निर्गमित दि.25.02.2026
- अखेर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना DA 58% दराने लागु ; GR निर्गमित दि.25.02.2026
- राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांकरीता दि.24.02.2026 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण GR