महागाई भत्ता वाढ बाबत लवकरच अधिकृत्त निर्णय ; एकुण डी.ए 60 टक्के !

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Official Decision Regarding Dearness Allowance Hike Soon ] : महागाई भत्ता वाढ संदर्भात आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 पासुन 58 टक्के दराने डी.ए वाढ मिळत आहे . आता माहे जानेवारी 2026 ची डी.ए वाढ बाकी आहे . सदर डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय लवकरच निर्गमित होण्याची शक्यता आहे .

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक : माहे जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंतचे सर्व ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत . सदर निर्देशांकाच्या आधारेच जानेवारीची डी.ए वाढ निश्चित केली जाते .

किमान 2 टक्के डी.ए वाढ निश्चित : माहे जानेवारी 2026 पासुन किमान 2 टक्के डी.ए वाढ निश्चित झाली आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे .

प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागु होईपर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वेतन / भत्ते  : दि.01.01.2026 पासुन आठवा वेतन आयोग लागु होणार आहे . परंतु प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागु होईपर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन / भत्ते अदा केले जाणार आहेत .

Leave a Comment