Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular issued regarding employees drawing salary and allowances from the Shalaartha system dated 20.03.2026 ] : शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक शिक्षण संचालनालय मार्फत दि.20.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहे कि , शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडी आदेश कार्यालयीन अभिलेखा प्रमाणे असले संदर्भात खातरजमा करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत .
माहे जुलै 2025 व त्या नंतरच्या कालावधीमध्ये राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता बाबतच्या संचिका , शालार्थ मान्यता आदेशांच्या संचिका व आदेशांच्या प्रति प्राप्त झाले आहेत किंवा कसे ?
तसेच सदरील मान्यता आदेश हे कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत का ? याबाबतची खातरजमा करणेबाबत संबंधितांना कळविण्यात आले आहेत . तसेच दि.18.11.2016 पासुन शालार्थ आयडी मान्यता आदेश देण्याबाबतची कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आलेली आहे . .
सदर तारखेच्या नंतर ज्या शिक्षक / कर्मचाऱ्यांचे नावे शालार्थ प्रणालीअंतर्गत नाव नमुद करण्यात आलेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यता आदेशाची प्रत वरिष्ठ कार्यालयांकडून निर्गमित करण्यात आलेली आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांबाबत काही संशय अथवा कागदपत्रे जुळत नसतील तर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .



- दहावी / बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र मोठा बदलाव ; परिपत्रक निर्गमित दि.25.03.2026
- शालार्थ प्रणाली मधून वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- घरभाडे भत्ता ( HRA ) बाबत एप्रिलपासुन नविन नियमावली .. जाणून घ्या सविस्तर .
- शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षकेत्तर पदांच्या ( लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदांच्या तब्बल 17,500 रिक्त जागेसाठी महाभरती !
- चारित्र्य व पुर्वइतिहास पडताळणी ( कर्मचारी संदर्भात ) प्रक्रिया मध्ये सुधारणा GR निर्गमित दि.27.03.2026