दहावी / बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र मोठा बदलाव ; परिपत्रक निर्गमित दि.25.03.2026

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Big decision regarding 10th/12th marksheet and certificate; Circular issued on 25.03.2026 ] : दहावी व बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र संदर्भात राज्यमंडळ मार्फत मोठा निर्णय घेण्यात आला आहे .या संदर्भात दिनांक 25.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे फेब्रुवारी / मार्च 2026 परीक्षेपासुन माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ती एकत्रित देण्यात येणार आहेत.

तसेच एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव वडीलांचे व आडनाव या क्रमाने छपाई करण्यात येणार आहे . तसेच प्रवेशपत्रावरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास त्यावर योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्याकडून स्वाक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आलेत .

तसेच ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरुस्त केले आहेत , त्यांची माहिती एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर अचूक छापण्यासाठी पुन्हा अपलोड करणे आवश्यक असणार आहेत . त्याकरीता मंडळाच्या संकेतस्थळावर फोटो करेक्शन ही लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे .

तसेच विद्यार्थ्यांच्या नावाच्या बदललेल्या क्रमाकाबाबतही सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सदर वाव अवगत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment