Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ After the increase in dearness allowance, this allowance of central employees has doubled. ] : महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खाली नमुद भत्तामध्ये चक्क दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे .
केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिनांक 15.09.2022 रोजीच्या सुचनांमध्ये सुधारणा करुन परिपत्रक जारी करण्यात आले आहेत . सदरचा निर्णय हा केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांकरीता घेण्यात आलेला आहे . दिव्यांग श्रेणी अंतर्गत कर्मचाऱ्यांना परिवहन भत्ता मध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
परिवहन भत्ता वाढ : केंद्र शासन सेवेत दिव्यांग व्यक्तींचे हक्क व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग अंतर्गत परिभाषित करण्यात आलेले कर्मचारी सदर परिवहन भत्ता वाढीच्या सुविधा करीता पात्र असणार आहेत . यांमध्ये सेरेब्रल , पाल्सी , कुष्ठरोग बरा झालेले , लोकमोटर अपंगत्व , बीनेपणा , स्नायुंचे अपंगत्व , ॲसिड हल्याचे बळी , पाठीचा कण्याचे आजार असणारे …
हे पण वाचा : महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ;
तसेच मुक व श्रवणदोष असणारे कर्मचारी , कर्णबधीर , ऑटिझम स्पेक्टॅम डिसॉर्डर , बौद्धिक अपंगत्व , दीर्घकालिन न्युरोलॉजिकल स्थिती , बहिरेपणांसह अनेक अपंगत्व , मल्टीपल स्क्लेरोसिस , अशा आजारांने बाधित असणारे कर्मचाऱ्यांना सदर वाढीव परिवहन भत्ताचा लाभ मिळणार आहे .
या निर्णयामुळे केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे . दिव्यांग कर्मचाऱ्यांना परिवहन करीता येणाऱ्या अडचणी लक्षात घेता , सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025