Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Salary hike in the new pay commission is based on TOR ] : नविन वेतन आयोगातील पगारवाढ ही टीओआर वर आधारित असणार आहे , त्या शिवाय नविन वेतन आयोग लागु केला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे .
केंद्र सरकारने नविन वेतन आयोग लागु करण्यास हिरवा कंदील दिला असला तरी , प्रत्यक्ष नविन वेतन आयोगाचे मुख्य कामास सुरुवात झाली नाही . प्रारंभिक कामांमध्ये आठवा वेतन आयोगासाठी अध्यक्ष , सदस्यांची निवड प्रक्रिया सुरु आहे .
नविन वेतन आयोगांमध्ये देशातील लाखो कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना सध्याच्या महागाईचा सहज सामना करता येणार आहे .
नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) : नविन वेतन आयोग हे टीओआर वर आधारित असणार आहे , Terms of Reference म्हणजेच संदर्भ अटी होय . एक एक प्रकारचा सरकारी यंत्रणेतील महत्वपुर्ण दस्तऐवज असून , वेतन आयोग समितीला नेमका कोणत्या विषयांवर कार्य करायचे आहेत हे दर्शविते .
म्हणजेच नविन वेतन आयोग समितीस पगारवाढ करीता कोणत्या बाबींचा विचार करायचा आहे , कोणकोणत्या मर्यादा असतील हे सदर दस्तऐवज मध्ये नमुद असते . कर्मचारी बाजुचे सचिव श्री.शिव गोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे कि , केंद्रीय स्तरावरुन नविन वेतन बाबत TOR ला लवकरच मंजूरी दिली जाणार आहे . सदर एस्तऐवजाच्या मंजूरीनंतर वेतन आयोगास अधिकृतपणे आपले काम करता येणार आहेत .
हे पण वाचा : राज्य कर्मचारी व निवृत्तीचे वय … ( Retirement Age ) ; संक्षिप्त आढावा !
नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) : नविन वेतन आयोग हे दि.01.01.2026 पासुन लागु होणे अपेक्षित आहे . परंतु सध्याचे सरकारी यंत्रणेचे कामकाज पाहता , नविन वेतन लागु होण्यास ऑगस्ट 2026 पर्यंतचा कालावधी लागु शकतो .
पगारातील अपेक्षित वाढ : नविन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 ते 35 टक्के पर्यंतची वाढ होवू शकते . यांमध्ये किमान मुळ वेतन हे 18000/- रुपये वरुन वाढून 32000/- ते 44000/- पर्यंत वाढेल .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025