Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Ordinance regarding transfer dated 27.05.2026 ] : बदली संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.27.05.2026 रोजी शासन अध्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
यानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडत असताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे .
जनगणना 2027 शी संबंधित काम सुरु असल्यामुळे सन 2026 मध्ये करण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दिनांक 30.06.2026 रोजी अथवा त्यापुर्वी करण्यात येतील असे नमुद करण्यात आले आहेत .

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश