Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Revised Transfer Policy for Officers and Employees in Groups B, C, and D ] : बदल्यांचे सुधारित धोरण निश्चित करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.15.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
बदलीचे वर्ष : दि.31 मे पर्यंत बदल्याच्या वर्षे निश्चित करण्यात आले आहेत . यानुसार दि.31 मे पर्यंत पुर्ण झालेली सलग वास्तव्य सेवा ग्राह्य धरण्यात येईल .
एकुण कर्मचाऱ्यांच्या 30 टक्के पेक्षा अधिक नसतील इतक्या कर्मचाऱ्यांची एका वर्षात एकाच वेळी बदली करण्यात येणार नाही , असे स्पष्ट नमुद करण्यात आले आहेत . तसेच माहे सप्टेंबर व माहे डिसेंबर महिन्यात विनंती बदल्यांचे आदेश निर्गमित होतील , तर विनंती बदल्यांसाठी केवळ दोनदाच प्रस्ताव विचारात घेतले जाणार आहेत .
तसेच विनंती बदल्यांकरीता कोणत्याही प्रकारचे भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही , तसेच रिक्त पद उपलब्ध नसताना अथवा बदलीच्या प्रक्रियेने रिक्त पद उपलब्ध होत नसल्यास , केलेली बदली ही अनियमितता वा बदलीच्या प्रक्रियेने रिक्त पद उपलब्ध होत नसल्यास केलेली बदली ही अनियमितता गृहीत धरण्यात येईल व या अनियमिततेस माहिती पुरविण्याच्या संबंधित कार्यालयाच्या प्रमुखास जबाबदार धरण्यात येणार आहे .
विनंती बदल्या : विनंती बदली करता पुढील प्रयोजन असेल तरच विनंती बदलीचा विचार करण्यात येईल .
- पक्षाघाताने आजारी कर्मचारी / कुटुंबातील अवलंबून असणारा सदस्य
- अपंग कर्मचारी / मतिमंद मुलांचे पालक
- हृय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी अथवा कुटुंबातील अवलंबून असणारा सदस्य
- जन्मापासुन एकच मुत्रपिंड असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी
- कॅन्सरने आजारी कर्मचारी अथवा कुटूंबातील अवलंबून असणारा सदस्य
- आजी / माजी सैनिक / अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
- विधवा कर्मचारी
- कुमारिका कर्मचारी
- परित्यक्ता / घटस्फोटित महिला कर्मचारी
- वयाची 53 वर्षे पुर्ण कलेले कर्मचारी
- पती पत्नी एकत्रिकरण
- इयत्ता दहावी / बारावी मध्ये शिक्षण घेत असलेले पाल्य असणारे कर्मचारी
बदल्या ह्या समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण निश्चित केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येईल .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहु शकता ..
- पदोन्नती संदर्भात सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत GR निर्गमित दि.15.04.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- गट ब , क व ड संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सुधारित धोरण ; GR निर्गमित दि.15.04.2026
- दि.13.04.2026 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 07 मोठे कॅबिनेट निर्णय !
- दि.21 एप्रिलपासुन राज्य सरकारी / निमसरकारी व शिक्षकांचा बेमुदत संपाचा इशारा !