Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 03 financial benefits along with salary/pension payment for the month of July to state employees/pension holders; know the details. ] : राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जुलै महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 03 मोठे आर्थिक मिळणार आहेत .
वार्षिक वेतनवाढ : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यांत मुळ वेतनाच्या 03 टक्के वार्षिक वेतनवाढ , लागु करण्यात येते .यामुळे मुळ वेतनांसह इतर देय भत्ते मध्ये देखिल वाढ होणार आहे . ( जसे मुळ वेतनावर आधारित डी.ए , ए.आर.ए , प्रोत्साहन भत्ता इ. )
महागाई भत्ता वाढ : केंद सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना या महिन्यांच्या शेवट पर्यंत 02 टक्के डी.ए वाढीची दाट शक्यता आहे . यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दिनांक 01.01.2025 पासुन एकुण डी.ए 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होईल .
महागाई भत्ता फरक : सदर वाढीव महागाई भत्ता हा दिनांक 01.01.2025 पासुनच लागु केला जाणार असल्याने ,दिनांक 01.01.2025 पासुन महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्यातील सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जुलै महिन्यांच्या पगारासोबत अदा केला जाईल .
वार्षिक वेतनवाढ जुलै महिन्यांच्या पगारासोबत लागु होईलच , याशिवाय डी.ए वाढीच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष वाढीव डी.ए व डी.ए फरकाची रक्कम जुलै महिन्यांत अदा केले जाईल .