@marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ Now a year-long Fastag pass for Rs 3,000/-; Transport Minister’s big announcement.. ] : आता फक्त 3,000/- रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टटॅग पास काढता येणार आहे , याबाबत देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे .
खाजगी वाहन धारकांना वेळोवेळी फास्टटॅगचा रिचार्ज करावा लागतो , परंतु आता आपण एकदाचा वर्षभराचा रिचार्ज करता येणार आहे . या नविन योजना नुसार आता आपण 3,000/- रुपये भरुन वर्षभर अथवा 200 ट्रिप पर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे , सदरची योजना ही दिनांक 15 ऑगस्ट 2025 पासुन लागू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .
या संदर्भात केंद्राची परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर खातेवर ट्टिट करुन याबाबत माहिती दिली आहे . या नविन योजनांनुसार खाजगी वाहन धारकांना कमी खर्चामध्ये पास काढता येणार आहे .
टोलनाक्याच्या 60 किलोमिटरच्या परिघातामधील खाजगी वाहन धारकांसाठी सदरचा पास वैध असणार आहेत . एकदा पास काढल्यानंतर हा पास वर्षभर / 200 ट्रिप्स या पैकी जे अगोदर संपेल तो पर्यंत हा पास वैध असणार आहे .
या पासची किंमत ही 3,000/- रुपये इतकी असून , याची सुरुवात येत्या 15 ऑगस्ट 2025 पासुन करण्यात येणार आहे . या योजनेचा लाभ देशातील लाखो खाजगी वाहन धारकांसाठी होणार आहे .
पास कसा काढणार ? : पास काढण्यासाठी स्वतंत्र लिंक NHAI / MoRTH च्या अधिकृत्त संकेतस्थळावर लवकरच प्रदर्शित केली जाईल . त्या लिंकच्या माध्यमातुन पास काढता येणार आहे .