News : दिनांक 20 जून रोजीच्या प्रमुख चालू घडामोडी ; जाणून घ्या संक्षिप्त वृत्त !

@मराठी संहिता  [ Major current affairs on June 20 ]  : दिनांक 20 जून रोजी च्या प्रमुख बातम्यांचा संक्षिप्त आढावा या लेखांमध्ये पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..

01. यंदाचा पाऊसमान : दरवर्षीपेक्षा यावर्षी सरासरीपेक्षा 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे . जास्त पर्जन्यामुळे बऱ्याच फळ पिकांचे नुकसान होताना दिसून येत आहे .

02. इराण – इस्राईल युद्ध : सध्या जागतिक पातळीवर इराण इस्राईल सुरू झाली आहे , दोन्ही देश एकमेकावर सातत्याने हल्ले करत आहेत . भीतीपोटी इराणच्या राजधानी शहरातील नागरी पलायन करीत आहेत . या युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर इंधनाचे दर वाढत आहे .

03. राज्यात त्रिभाषीय धोरणास राज ठाकरे यांचा विरोध : राज्यामध्ये त्रिभाषीय धोरण राबविण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली असून , सदर त्रिभाषीय धोरणास राज ठाकरे यांच्याकडून विरोध केला जात आहे . या त्रिभाषीय धोरणामध्ये मराठी हिंदी व इंग्रजी या तीन भाषांचा वापर करण्याचे निर्देश आहेत .

04. सौर फवारणी यंत्र अनुदान करिता आवेदन : सौर फवारणी यंत्र 50 टक्के , 40% अनुदान करिता ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटीपी पोर्टलवर आवेदन मागवण्यात येत आहेत .

05. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 20 वा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *