सरकारी नोकरीची तयारी कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ How to prepare for a government job? Know detailed information.. ] : सरकारी नोकरीची तयारी नेमकी कशी करावी ? नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती या लेखामध्ये सविस्तरपणे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

सरकारी नोकरीसाठी प्रथम आपल्याकडे अभ्यासामध्ये सातत्य हवे , तसेच अभ्यासक्रमानुसार अभ्यास करणे आवश्यक आहे . तसेच आपणांस कोणत्या पोस्ट साठी अभ्यास करावयाचा आहे , त्या साठी आवश्यक अभ्यासक्रमाच्या अनुसरुन आपली पात्रता पुर्ण असणे आवश्यक असेल .

सरकारी नोकरीचे स्वरुप : सरकारी नोकऱ्या ह्या गट अ , ब , क व ड संवर्गांमध्ये विभागलेल्या आहेत . संवर्गनिहाय परीक्षांचे स्वरुप देखिल वेगवेगळे असते . गट अ व ब संवर्गातील संवर्गातील पदांसाठी केंद्रीय लोकसेवा तर राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत परीक्षा घेण्यात येते ..

तर गट क व ड संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात . सरळसेवा परीक्षांचे काठिण्य पातळी ही पदवी अभ्यासक्रम पर्यंत असते . याकरीता गणित , मराठी , इंग्रजी व सामान्य ज्ञान असे 04 विषय अभ्यासक्रमांसाठी असतात .

तर गट ड संवर्गातील पदांसाठी देखिल सरळसेवा पद्धतीनेच परीक्षा घेतल्या जातात . यांमध्ये काही पदांच्या परीक्षा ह्या प्रत्यक्ष जॉब ओरिएंटेड परीक्षा घेतल्या जातात , जसे कि सफाईगार पदासाठी प्रत्यक्ष सफाईचे कौशल्ये आत्मसात असणे आवश्यक असते .

पोलिस भरती : पोलिस भरती ही गृह विभाग अंतर्गत येते , पोलिस हवालदार करीता 50 गुणांची शारिरीक चाचणी तर 100 गुणांची लेखी चाचणी घेतली जाते .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *