Marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ Farmers in the state get loans at low interest rates for various works through Bank of Maharashtra (BOM) ] : आपल्या महाराष्ट्रात बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक प्रादेशिक बँक कार्यरत असून , शेतकऱ्यांना विविध कामासाठी कर्ज उपलब्ध करुन देते .
सर्वसाधारण बाबीसाठी शेतकऱ्यांना कर्ज : बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड , सोने तारण कर्ज कृषी अशा सर्वसाधरण बाबीसाठी कर्ज पुरवठा करण्यात येते .
फार्महाऊस ( शेतामध्ये घर ) करीता कर्ज पुरवठा : शेतामध्ये घर बांधणीकरीता बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत कर्ज पुरवठा करण्यात येते . या करीता शेतकऱ्याकडे किमान 2.5 एकर शेती असणे आवश्यक असेल , त्याचे मागील 03 वर्षाचे बँकीग व्यवहार चांगले असणे आवश्यक असेल .कर्जाची रक्कम शेतीवर आधारीत 50 लाख रुपये पर्यंत मिळू शकते .
02/03 व्हीलर खरेदी करीता कर्ज पुरवठा : शेतकऱ्यांना 02/03 व्हीलर खरेदी करण्यासाठी शेती तारणावर आधारित कर्ज पुरवठा करण्यात येते . कर्जाची कमाल मर्यादा ही 2 लाख रुपये इतके असेल .
04 व्हीलर खरेदी करीता कर्ज पुरवठा : शेतकऱ्यांना ट्रक्टर खरेदी करण्यासाठी 20 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येते .
इतर बाबीसाठी कर्ज पुरवठा : वरील बाबींशिवाय शेतकऱ्यांना वेअरहाऊस बांधणी करीता , जमीन खरेदी करणे , सिंचर खरेदी , हाय-टेक प्रोजेक्ट करीता , पशुपालन , सोलर वॉटर हिटर अशा बाबींसाठी कर्ज पुरवठा करण्यात येते .