@marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Don’t live life with tension; suffering is on everyone’s path. ] : आयुष्यात प्रत्येकालाच टेन्शन आहे , तर जगत असताना नेहमीच दुख : घेवून मिरवण्यापेक्षा , त्यातुन स्वत : सावरुन जगण्याचा प्रयत्न करावा .
दुख : / टेन्शन आपल्याच वाटेल : प्रत्येकास असे वाटते कि , देवाने सारे दुख : / टेन्शन आपल्याच वाटेल दिले आहे . यामुळे आपण नेहमीच दुखात जगत असतो . तर आपण दुख : ज्या गोष्टीसाठी करतो तो एक प्रकारचा मोह असल्याचे शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे .
या तीन गोष्टी सोडा : काम , लोभ , रोग या तीन गोष्टी आपल्या आयुष्यातुन सोडा तरच आपल्याला आयुष्यात सुख मिळेल , कारण या तीन गोष्टींचा हव्यास कराल तेवढाचा वाढत जाईल . परिणामी आपल्याला आयुष्यात कधीच सुख मिळणार नाही .
इतरांना खुप मिळाले : आपल्या मनामध्ये एकच गोष्ट खडकत असते , ती म्हणजे आपल्या मित्राला , आपल्या शेजाऱ्याला आपल्यापेक्षा खुप काही कमी वयात मिळाले , तर त्या तुलनेत आपल्याला काहीच मिळाले नाही .
अशी भावना आपल्या मनामध्ये कधीच आणु देवू नका , तर सतत आपल्या कामांमध्ये स्वस्त रहावे , ते काम आनंदाने करावे यश आपोआप मिळेल .
यश म्हणजे काय ? : यश आणि अपयश यांच्या व्याख्या प्रत्येकांच्या मनानुसार वेगळ्या आहेत . काहीच्या मनांमध्ये यश म्हणजे खुप जास्त पैसे कमविणे म्हणजे यश होय , तर काहींच्या विचारानुसार आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करुन आयुष्य आनंदाने जगणे म्हणजे यश होय . यामुळे यश वैगेरे सर्व काही मोह – माया आहे , त्यामुळे आपण आपले आयुष्य नेहमीच आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावे .
काहींच्या आयुष्यात कमी काळातच खुप सारे धन प्राप्त होते , व आपले आयुष्य देखिल कमी वयात मृत्यु होतो , तर काहींना उशिरा धन प्राप्त होते , व दिर्घायुष लाभते . यामुळे धनाचा लोभ न करता आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावे .