पोलिस महाभरती 2025 : राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिस पदभरती तसेच महिला पोलिसांचे विशेष दल निर्मितीस मंजूरी !

@marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Approval for recruitment of police posts in proportion to population in the state and creation of a special force of women police ] : राज्यांमध्ये पोलिस पदभरती ही राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यास , तसेच राज्यांमध्ये महिला पोलिसांचे विशेष दल निर्मितीस राज्य शासनांकडून मंजूरी देण्यात आलेली आहे .

राज्यांमध्ये पोलिस पद हे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवर अवलंबुन न राहता , लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या असणे आवश्यक आहे . यामुळे नुकतेच एका कार्यक्रमांमध्ये राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिस पदभरतीस मंजुरी दिली आहे .

जिल्हा सांगली येथे पोलिस दल मार्फत तीन इमारतीचे उद्घाटन त्याचबरोबर निवास स्थानाचे भुमिपूजन राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले , या कार्यक्रमा प्रसंगी मा.मुख्यमंत्री यांनी लोकसंख्या प्रमाणात पोलिस पदभरती करण्यास मंजुरी दिली आहे .

विशेष महिला पोलिस दल : मागील वर्षी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात विशेष महिला पोलिस दलाची निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली होती . यानुसार राज्य सरकारकडून सकारात्मकता असुन , राज्यांमध्ये विशेष पोलिस दल निर्मिती केली जाणार आहे .

राज्य सशस्त्र पोलिस दल मध्ये केवळ पुरुषांना घेतले जाते , याप्रमाणे आता महिलांचे विशेष दल निर्मिती केली जाणार आहे , जी कि सध्याच्या काळांमध्ये अत्यावश्यक आहे .

बऱ्याच ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेच्या बाबीकरीता महिला पोलिस कर्मचारी अपुरी पडते , यामुळे सदर सुरक्षिता लक्षात घेवून , प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक महिला पोलिस दलाची निर्मिती केली जाणार आहे .

सप्टेंबर महिन्यांमध्ये अधिकृत्त पदभरती जाहीरात : येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत गृह विभागांमध्ये सुमारे 16,000 पोलिस शिपाई ( पोलिस शिपाई , बँड्समन , चालक , कारागृह पोलिस , रेल्वे पोलिस ) पदावर पदभरती जाहीरात प्रसिद्ध केली जाईल .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *