HSRP : जुन्या वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नोंदणी साठी मुदतवाढ ; वाचा सविस्तर परिपत्रक .

Marathisanhita प्राची पवार प्रतिनिधी [ HSRP: Extension of deadline for high security registration for old vehicle owners ] : जुने वाहन नोंदणी ( दिनांक 01.04.2025 पुर्वीचे ) असणाऱ्या जुन्या वाहनांकरीता HSRP नंबर प्लेट साठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे . राज्य शासनांच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून दिनांक 20 जुन 2025 रोजी याबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आलेले होते , तर दिनांक 20.03.2025 रोजीच्या परिपत्रकानुसार सदर मुदत ही दिनांक 30 जुन 2025 पर्यंत वाढविण्यात आली होती . तर अनेक जुन्या वाहन धारकांना ..

सदर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे बाकी आहे , यामुळे सदरची मुदत ही सदर दिनांक 20 जुन 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे . यामुळे दिनांक 01 एप्रिल 2019 पुर्वी नोंदणीकृत वाहन धारकांना ..

सदर नविन नंबर प्लेट बसविण्याची ही अंतिम मुदत असणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर मुदतीनंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यामुळे दिनांक 01.04.2019 पुर्वी नोंदणी असणाऱ्या वाहन धारकांनी दिनांक 15.08.2025 पर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *