Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ : Mahabharti for 10 thousand posts of Police Constable posts under the State Home Department in September ] : महाराष्ट्र राज्य शासनांच्या गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई ( Police Constable ) पदांच्या तब्बल 10,000 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया करण्यात येणार आहे .
राज्याचे अपर पोलिस महासंचालक यांच्या कार्यायाकडून प्राप्त माहितीनुसार , येत्या माहे सप्टेंबर 2025 पासुन महाराष्ट्र पोलिस शिपाई पदासाठी महाभरती सुरु केली जाणार आहे . सन 2024 व माहे डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांवर पदभरती करण्यात येणार आहे .
डिसेंबर 2025 पर्यंत राज्याच्या गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदांचे तब्बल 10,000 पदे रिक्त होणार आहेत , सदर 10 हजार रिक्त पदांवर 12-13 लाख आवेदन येण्याची शक्यता आहे .
माहे सप्टेंबर महिन्यांत गणेश विसर्जन उत्सवानंतर प्रत्यक्ष पोलिस पदभरतीची मैदानी चाचणी होणार असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे . मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची लेखी चाचणी घेण्यात येईल , व शेवटी मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित करुन मेरीट यादी प्रसिद्ध करण्यात येईल .
सदरची पोलिस पदभरती प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी निदान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे . यंदाच्या वेळी पोलिस भरती प्रक्रिया करीता केवळ एकाच पदासाठी आवेदन सादर करता येणार आहे . एकापेक्षा अधिक आवेदन रद्द करण्यात येणार आहेत .