Marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ Indian post department digipin ] : भारतीय डाक विभाग मार्फत पिन कोड ऐवजी डिजिपिन प्रणाली जाहीर झाली आहे . यामुळे आता भारतीय डाक विभाग तसेच पार्सल सुविधा देणाऱ्या कंपन्यांसाठी घरपोच पार्सल देणे अधिक सोईस्कर ठरणार आहे .
डिजिपिन काय आहे ? : आपणांस पिन कोडच्या माध्यमातुन केवळ गावाचा पत्ता कळतो , परंतु आजच्या युगामध्ये अचुक पत्ता प्राप्त न झाल्याने , बऱ्याचदा पार्सल परत जातो . परंतु आता डिजिपिन मुळे अचुक पत्ता पाहता येणार आहे . ज्यामुळे भारतीय डाक विभागाला डिजिटल वेग मिळणार आहे .
भारतीय डाक विभागाने आयआयटी हैद्राबाद व NRSC यांच्या समवेत डिजिपिन विकसित करण्यात आले आहे . यांमध्ये अक्षांश – रेखांशांची 4×4 मीटरच्या ग्रीड मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे . यामुळे अचुक पत्ता दिसणार आहे , हा डिजिपिन हा आपणांस सेट केलेल्या लोकेशन करीता असणार आहे .
जर आपले घर दुर्गम , ग्रामीण परिसरात असल्यास त्या ठिकाणी डिलिव्हरी करायची असल्यास , या डिजिपिनचा फायदा होणार आहे .
पिनकोड बंद होणार का ? : पिन कोड बंद होणार नसुन , आपले पार्सल अचुक पत्यावर प्राप्त करण्यासाठी डिजिपिनचा वापर करण्यात येणार आहे .
डिजिपिन कसा प्राप्त कराल ? : आपल्या लोकेशनचा डिजिपिन मिळविण्यासाठी dac.indianpost.gov.in/mydigipin/ या संकेतस्थळावर जावून आपले लोकेशन अक्सेस देवून डिजिपिन प्राप्त करु शकता .