Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Central employees will benefit from a DA increase of 60% and state employees will benefit from a DA increase of 58%. ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 टक्के तर राज्य कर्मचाऱ्यांना 58 टक्के दराने डी.ए वाढीचा लाभ मिळणार आहे .
केंद्रीय कर्मचारी / पेन्शनधारक : केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2026 पासुन आणखीण 02 टक्के डी.ए वाढ होणार आहे . सदर डी.ए वाढीचा अधिकृत्त निर्णय होळीच्या आत घेतला जाणार आहे , यामुळे केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2026 पासुन एकुण 60 टक्के दराने डी.ए वाढीचा लाभ मिळणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना जुलै पासुन डी.ए वाढ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना 03 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकुण डी.ए हा 55 टक्के वरुन 58 टक्के इतका होणार आहे .
या संदर्भातील अधिकृत्त शासन निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत निर्गमित होणार असल्याची माहिती समोर येत आहे . यामुळे माहे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या सात महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीचा फरक देखिल अदा केला जाणार आहे .
माहे जानेवारी 2026 पासुन केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे डी.ए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्यात येणार आहे , परंतु त्याकरीता जुलै 2026 पर्यंत वाट पाहावी लागेल .
- सन 2026 मधील सार्वजनिक सुट्या अधिकृत्त अधिसुचना निर्गमित दि.05.12.2025 ; जाणुन घ्या सविस्तर यादी !
- राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या !
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने डी.ए वाढीचा लाभ !
- राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डी.ए वाढ कधी ? आली मोठी आनंदाची अपडेट !
- महागाई भत्ता 50% झाल्यापासुनच निवृत्ती उपदानाचा कमाल मर्यादेत वाढ ; निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच .. परिपत्रक निर्गमित !